दोन मृत्यु!
अगदी तरुणच दोघही. अजून धड आयुष्य न पाहिलेले. दोन्ही मृत्यु नैसर्गिक नव्हते. एकानी मृत्युला आपणहून कवटाळलं आणि दुसर्यानी मृत्युला छातीवर झेललं. तरीही किती फरक त्या दोन मृत्युंमधे. एक आत्महत्या आणि दुसरं बलीदान.
आत्महत्या जी नैराश्यातून आली.नुसत्या नैराश्यातून आली असेल? की कोणीतरी brain washing केलं असेल? आपल्या मरणानी आपल्या समाजाचं ,कुटुंबाचं भलं होईल,आपण हिरो ठरू असा काहीसा विचार किंवा अविचार असेल कोणीतरी भरवून दिलेला? जीव देताना आपले असहाय आईवडील,कुटुंब डोळ्यासमोर आलच नसेल? बलीदानाने तो काही काळापुरता,काही लोकांपुरता हिरो ठरलाही.पण हे बलीदान होतं की आत्मघात. त्याच्या मृत्युला बलीदान ठरवून काही राजकारण्यांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्नही केला असेल. तो एकाच जमातीचा भाग ठरला. जवळचे सोडून त्याचं नांवही सगळे विसरून जातील. त्याला नाहीच पण त्याच्या कुटुंबालाही काही फायदा मिळणार नाही. कुणाच्यातरी नादी लागून ओढवून घेतलेली बरबादी.जिद्द धरून जिवंत राहीला असता तर काहीही करू शकला असता.
दुसरा मृत्यु देशासाठी . खरं बलीदान. मृत्यु समोर दिसत असताना त्याच्याही डोळ्यासमोर आले असतील त्याचे प्रेमळ आईवडील,राखी तयार ठेऊन वाट पहाणारी बहिण,अजूही नविनच असणारी प्रियतमा आणि दोन वर्षाचं अबोध पिलू.पण क्षणार्धात समोरचा राक्षस माझ्या लाखो आईवडीलांचे,प्रिय देशबंधुभगिनींचे प्राण घेऊ शकतो मग त्याला मारायलाच पाहिजे,माझे ध्येय देशरक्षणाचे आहे, हा अगदी सुसंगत पक्का विचार. शत्रूला तर चारीमुंड्या चीत केलच पण मृत्युला पुढे होऊन त्यानी छातीवर घेतलं तेव्हा मृत्युसुद्धा भयभीत झाला असेल.
ज्याच्या मरणाने प्रत्येक भारतीय खराखुरा हळहळला,रडला,ज्याचं नांव अत्यंत आदरपूर्वक,अभिमानाने कायम घेतलं जाईल तो वीर हाच खरा हीरो. त्याच्या कुटुंबाचा सारा देश कायम ऋणी राहील. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोनी लोक जमले ते आपले सर्व भेदभाव विसरून.श्रीमंत गरीब,स्त्री पुरूष,बडे सामान्य,सर्व स्तराचे,जाती धर्माचे लोक अश्रू ढाळत त्याला मानवंदना देत होते तेव्हा ते फक्त भारतीय होते.
एकाच्या मृत्युने समाजातली दरी अधिक रुंदावली आणि दुसर्याच्या मृत्युने सामाजिक एकीचे दर्शन घडवले.
मेजर कौस्तुभ राणे आम्ही भारतीय, तुझे बलीदान कधीच विसरणार नाही. आमच्या मनामनात देशभक्तीची ज्योत पेटवून तू अमर झालास.तुझ्या शौर्यापुढे आम्ही नतमस्तक आहोत.

विशाखा टिपणीस
११/०८/२०१८
११/०८/२०१८
No comments:
Post a Comment