खरंच मैत्रीला गरज आहे ,एका स्पेशल दिवसाची,संदेशाची,रेशमी धाग्याची?
जिथे प्रत्येक श्वास उत्सव असतो, शब्दाविना भावना पोचते,मनं गुंतलेली असतात,
तिथे खरंच का अशी गरज आहे?
मैत्री, मग ती ,
तो आणि तो,
कृष्ण सुदाम्याची असेल,
ती आणि ती,
उषा चित्ररेखेची असेल किंवा
शब्दावाचून मनं वाचणार्या
तो आणि तीची असेल.
प्राण्या,पक्षांशी असेल,
झाडा फुलांशी असेल,
अथांग समुद्राशी असेल,
असीम आभाळाशी असेल.
निखळ,नितळ,मुक्त ,निःशंक
ती मैत्री.
कधी हास्याच्या खळखळाटात,गोंगाट कलकलाटात,
तर कधी ओलावल्या डोळ्यांनी,
समंजस शांततेत ती साजरी होते,
कधी दुसर्या बाजूनी रुसण्यात,
आणि समजूत घालताना आपला मी सुखावण्यात असते
ती मैत्री.
गाठी भेटी,गप्पा गोष्टी,संवाद
हवाहवासा असतो
पण आवश्यक नसतो
ती मैत्री.
जिथे हेव्यादाव्यांना जागा नसते,
गैरसमज क्षणिक आणि
विश्वास अक्षय असतो,
ती मैत्री ***
तरीही मैत्री दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
जिथे प्रत्येक श्वास उत्सव असतो, शब्दाविना भावना पोचते,मनं गुंतलेली असतात,
तिथे खरंच का अशी गरज आहे?
मैत्री, मग ती ,
तो आणि तो,
कृष्ण सुदाम्याची असेल,
ती आणि ती,
उषा चित्ररेखेची असेल किंवा
शब्दावाचून मनं वाचणार्या
तो आणि तीची असेल.
प्राण्या,पक्षांशी असेल,
झाडा फुलांशी असेल,
अथांग समुद्राशी असेल,
असीम आभाळाशी असेल.
निखळ,नितळ,मुक्त ,निःशंक
ती मैत्री.
कधी हास्याच्या खळखळाटात,गोंगाट कलकलाटात,
तर कधी ओलावल्या डोळ्यांनी,
समंजस शांततेत ती साजरी होते,
कधी दुसर्या बाजूनी रुसण्यात,
आणि समजूत घालताना आपला मी सुखावण्यात असते
ती मैत्री.
गाठी भेटी,गप्पा गोष्टी,संवाद
हवाहवासा असतो
पण आवश्यक नसतो
ती मैत्री.
जिथे हेव्यादाव्यांना जागा नसते,
गैरसमज क्षणिक आणि
विश्वास अक्षय असतो,
ती मैत्री ***
तरीही मैत्री दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
विशाखा टिपणीस
५/८/२०१८
५/८/२०१८
No comments:
Post a Comment