कालचा १४ जुलै २०१९ चा रविवार अविस्मरणीय ठरला. स्पर्धा म्हणजे काय, ह्याचा खरा अर्थ कळला.
क्रिकेट विश्वकप स्पर्धेत तांत्रिक नियम लावून इंग्लंड विश्वकपाचा मानकरी ठरला आणि त्याच नियमामुळे न्यूझीलंडला विश्वकप गमवावा लागला.
जो जिता वोही सिकंदर हे खरं असलं तरी आणि इंग्लंडचा विजयोत्सव व न्यूझीलंडची अश्रुपूर्ण निराशा अगदी सहाजिक असली तरी आमच्यासारख्या प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा अप्रतिम खेळ दोन्ही संघांनी केला. दोन्ही संघांची कामगिरी त्यांच्या देशाची मान उंचावणारीच होती. प्रेक्षकांच्या दृष्टीने दोन्ही संघ जगज्जेते ठरले.
असा न भूतो न भविष्यति सामना खेळल्याबद्दल दोन्ही संघांचं मनापासून कौतुक व अभिनंदन.

टेनिसमधेही विंबल्डनचं महत्त्व आगळं आहे. काल जगज्जेता फेडरर आणि नव्या दमाचा जोकोविच यांच्यातला अंतिम सामना प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरला. दोनही तुल्यबळ खेळाडूत उजवा डावा नव्हताच. दोघही अप्रतिम. शेवटच्या क्षणी कुणीतरी एक जिंकणार. जोकोविच जिंकला. जोकोविचचं कौतुक करणार्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात फेडररबद्दलही तेवढच कौतुक दाटलं होतं. त्याचं स्थान प्रत्येक मनात अढळच राहिलं. एकमेकांच्या विषयी त्या दोघांनी आदरपूर्वक केलेली वक्तव्य, दोघांचाही सुसंस्कृत पणा दाखवणारी होती.
आयुष्यही असंच असावं नाही का? निकोप स्पर्धा जरूर असावी. आपापली क्षमता आजमावणारी, वाढवणारी, एकमेकाबद्दल आदर आणि प्रेम दर्शविणारी आणि बाकीच्यांना भरपूर आनंद देणारी.
विशाखा टिपणीस.
१५/०७/२०१९
१५/०७/२०१९
No comments:
Post a Comment