काल एका काकांचा फोन आला. त्यांचा माझा परिचय अगदी अल्प. माझ्या सासूच्या मैत्रीणीचे यजमान. मावशी आमच्याकडे खूप यायच्या. पण गेली कित्येक वर्षे त्यांना स्मृतिभ्रंश झालाय. मागे एकदा त्यांना भेटून आले मग जाऊ जाऊ म्हणत मागेच पडलं.
तर काय सांगत होते, फोनवर काकांनी परिचय दिला. एकदम नाही आलं लक्षात. काही क्षणांनंतर मला ओळख पटली. तसे काका गरजले, " ट्यूब उशीरा पेटली तुझी!" नंतरचं बरचसं संभाषण मी बरेच दिवसात त्यांच्याकडे गेले नाही, फोन केला नाही,माझ्या बातम्या त्यांना कशा बाहेरून कळल्या, वगैरे आरोपांच्या फैरी झडल्या. मी माझी बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते पण अडचणी सर्वांनाच असतात म्हणत तो परतवला गेला.
मग हळू हळू संभाषणाची गाडी ते कसे बुद्धीमान आहेत,त्यांची अर्थशास्त्रातली Ph.D , त्यांनी आयुष्यात गाजवलेलं कर्तुत्व,त्यांची गाण्याची आवड,अफाट वाचन,नियमित फिरणं,चांगली तब्येत( वय वर्ष ८६),स्मृतिभ्रंश झालेल्या बायकोला ते कसे लहान मुलासारखे सांभाळतात वगैरे अनेक विषयांभोवती फिरली. माझी भूमिका अर्थातच श्रोत्याची.
बोलता बोलता त्यांनी बजावलं १ ते ४ त्यांना disturb करायचं नाही,सात नंतरच फोन करायचा. भेटायला ते म्हणतील तेव्हाच जायचं. त्यांची स्वतःची मुलगी त्यांना गेल्या वर्षात ३/४ वेळा भेटायला आली होती पुण्यातच असून.( काही कारण असेल, मला माहित नसणारं)
फोन बंद करता करता म्हणाले, "फोन कर मधुन अधुन. भेटायला आलीस तर खूप छान छान कविता ऐकवीन तुला, माझ्याकडे खूप कलेक्शन आहे.
खरं तर मला जरा रागंच आला होता. त्यांचा चेहराही मला स्मरत नव्हता. पण मग एक करारी तरीही केविलवाणा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला. तरुणपणातला ताठा संपलेला,परिस्थितीने काळवंडलेला,मीपणा अट्टाहासाने जपणारा,एकाकी ,वृद्ध तरीही जगायची उर्मी असणारा, कोणीतरी श्रोता होऊन आपलं मनोगत ऐकावं अशी अपेक्षा करणारा,केविलवाणेपणा मीपणानी झाकणारा,तरीही माणसातल्या लहान मुलाचा निरागस चेहरा.
आणि
खूप समाधान वाटलं काकांनी माझी निवड केली श्रोता म्हणून. ठरवलं चांगला श्रोता व्हायचं, अशाच कुणा काका,मावशी किंवा अगदी समवयस्कांचा. आताच्या काळात फार गरज आहे अशा श्रोत्यांची.
पुढे आपण म्हातारे होऊ तेव्हा कदाचित कोणाला ऐकायला सवड नसेल. म्हणून आत्ताच मित्र,मैत्रीणी, आप्त,हितचिंतक ज्यांना ज्यांना जेव्हा भेटता येईल,बोलता येईल तेव्हा मन मोकळं करू या,त्यांचं मन जाणून घेऊया. माणसात राहू. प्रत्येक क्षण जगून घेऊ. मनातलं लहान मुल जागं ठेऊ.
मनातलं लहानमुल जागं ठेवणार्या प्रत्येकाला बालदिनाच्या रंगीत संगित,गोड शुभेच्छा!

विशाखा टिपणीस
१४/११/२०१८
१४/११/२०१८
No comments:
Post a Comment